esakal | PM मोदींच्या आईने घेतला लसीचा पहिला डोस; मोदींनी दिली ट्विटरवरुन माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Hiraben modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना कोरोना लसीचा पहिला खुराक देण्यात आला आहे.

PM मोदींच्या आईने घेतला लसीचा पहिला डोस; मोदींनी दिली ट्विटरवरुन माहिती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना कोरोना लसीचा पहिला खुराक देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: आपल्या ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलंय की, मी सर्वांना विनंती करतो लस घेण्यास  पात्र असलेल्या व्यक्तींना लस घेण्यास प्रोत्साहित करा तसेच या कामी त्यांची मदत करा. 

दरम्यान, भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर 1 मार्च रोजी कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वय वर्षे 60 च्या वरील लोकांना तसेच वय वर्षे 45 वरील कोमॉर्बोडीटीज अर्थात इतर गंभीर आजार असणाऱ्या लोकांना लस देण्यात येत आहे. 1 मार्च रोजीच पंतप्रधान मोदींनी लसीचा पहिला खुराक घेतला होता. 
हेही वाचा - Thank You India! लसीच्या मदतीमुळे भारावला कॅनडा; होर्डींग्ज लावून भारताचे आभार

loading image