मोदींचा शिवसेनेला जोरदार टोला

वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

जनता संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवत असते असे म्हणत नरेंद्र मोदींना शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर बोलताना त्यांनी शिवेसेनेला इशारा दिला आहे.  कर्नाटक पोवटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,' असेही मोदींनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जनता संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवत असते असे म्हणत नरेंद्र मोदींना शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर बोलताना त्यांनी शिवेसेनेला इशारा दिला आहे.  कर्नाटक पोवटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,' असेही मोदींनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दमदार विजय झाला असून 15 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांवर विजय मिळवला आहे तर ०२ जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय निश्चित होताच मोदींनी शिवसेनेला इशारा दिला आहे. 'कर्नाटकमध्ये आता जोडतोडीचं नाही तर स्थिर आणि मजबूत सरकार असणार आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; बाजूने केले मतदान

मोदी पुढे म्हणाले, 'झारखंडच्या लोकांनीही लक्षात ठेवायला हवं की काँग्रेस कधीच आघाडीचा धर्म निभावत नाही. काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी आघाडी आणि जनमताचा वापर करून घेते. त्यानंतर आपल्या हितासाठी सोबत असलेल्या पक्षांना वापरून घेते. याचा परिणाम म्हणजे लोकांना कधीही चांगलं सरकार मिळत नाही,'

एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या - अजित पवार

महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या सत्तानाट्यानंतर निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. मात्र असं असलं तरीही हे तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi slams shivsena