esakal | लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसला चिमटे; 'नयी सुबह, नया सूरज आया है|'

बोलून बातमी शोधा

pm narendra modi speech after 2020 budget session lok sabha

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'कामांचा वेग वाढवला नसता तर, देशांपुढील अनेक समस्या तशाच राहिल्या असत्या.'

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसला चिमटे; 'नयी सुबह, नया सूरज आया है|'
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली New Delhi : संसदेत अर्थसंकल्पी अधिवेशनात आज, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM Narendra Modi राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर निवेदन दिले. त्यांनी भाषणाचा रोख प्रामुख्यानं काँग्रेसवर ठेवला. गेल्या 70 वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं.  आजवर देशात काही घडलं नाही, असं मला म्हणायचं नाही. पण, राजकीय हेतूनं निर्णय घेण्यात आले, त्यामुळंच ते अपयशी ठरल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारच्या कामांच्या वेगावर आक्षेप ठेवला जात असल्याचं सांगून, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'कामांचा वेग वाढवला नसता तर, देशांपुढील अनेक समस्या तशाच राहिल्या असत्या.' देशानं केवळ सरकार बदललं नाही तर, देशाला काही तरी वेगळा निर्णय घ्यायचा होता म्हणूनच आम्हाला पुन्हा संधी मिळाली, असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. काँग्रेसला चिमटे काढताना मोदी म्हणाले, 'तुमच्या मार्गानं चाललं असतो तर, राम जन्मभूमीचा मुद्दा आजही वादातच राहिला असता, काश्मीरमधून कलम 370 हटलं नसतं, कर्तारपूर साहब कॉरिडॉर झाला नसता तर, भारत-बांग्लादेश सीमावाद कधीच सुटला नसता, मुस्लिम महिलांना कधीच तिहेरी तलाकमधून मुक्तता मिळाली नसती. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती झाली नसती. देशाला आता निर्णयांसाठी आणखी वाट पहायची नाही. त्यामुळचं आमचं सरकार वेगानं निर्णय घेतंय.'

आणखी वाचा - ओवेसींनी शाहीनबागला जोडलं जलियाँवाला बागशी

मोदी म्हणतात....

  • कामांचा वेग वाढला नसता तर ही कामं घडलीच नसती
  • 37 कोटी लोकांची बँक खाती एका वेळी उघडली नसती
  • 13 कोटी घरांमध्ये गॅस मिळाला नसता
  • 2 कोटी गरिबांसाठी परवडणारी घरं तयार झाली नसती 
  • 11 कोटी लोकांच्या घरी शैचालयं उभी राहिली नसती  

नयी सुबह, नया सूरज आया है| तुम्ही चांगल्या चष्म्यातून पाहलं तर तुम्हाला हे दिसेल. जर, आम्ही जुन्या वाटेनं गेलो असतो तर, देशात हा बदल पहायलाच मिळाला नसता. धाडसी निर्णय घेण्यासाठी आम्ही पुढं सरसावलो नसतो तर, हे शक्य झालं नसतं.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान