पंतप्रधान मोदींचा 'मॉर्निंग वॉक' तुम्ही पाहिला का? (व्हिडिओ) 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 डिसेंबर 2018

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिटनेसवर किती भर असतो, हे आतापर्यंत जवळपास सर्वांनाच ठाऊक झाले आहे. कितीही व्यग्र दिनक्रम असला, तरीही रोजचा व्यायाम ते चुकवत नाहीत. याचीच प्रचिती रविवारी आली.. 

पंतप्रधान मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असताना त्यांचा मुक्काम गांधीनगर येथे होता. गुजरातमधील केवाडिया येथे देशपातळीवरील पोलिस महासंचालकांची बैठक होती. त्या बैठकीत मोदी यांनी मार्गदर्शन केले होते. त्या बैठकीनंतर मोदी गांधीनगर येथे आले. 

गांधीनगर मुक्कामी असताना अगदी पहाटे पंतप्रधान मोदी व्यायामासाठी बाहेर पडले. त्यांच्याबरोबर मोजकेच सुरक्षा रक्षक होते. पंतप्रधान ही देशातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असल्याने त्यांना विशेष संरक्षण असते. पण गांधीनगरमध्ये मोदी 'मॉर्निंग वॉक'ला बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर किमान सहा जण होते. 

पंतप्रधान मोदी यांच्या 'मॉर्निंग वॉक'चा व्हिडिओ प्रीती गांधी यांनी ट्‌विट केला आहे. 

Web Title: PM Narendra Modi take a morning walk in Gandhinagar