esakal | संसद टीव्ही: नव्या सरकारी वाहिनीचे पंतप्रधान आज करणार उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

modi

संसद टीव्ही: पंतप्रधान करणार आज उद्घाटन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : देशात बुधवारपासून म्हणजेच आज (ता.१५) नवीन सरकारी वाहिनीची सेवा 'संसद टीव्ही' (sansad tv) उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे लोकार्पण करणार आहेत. हे चॅनेल लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीच्या विलीनीकरणाद्वारे तयार केले गेले आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू (Venkaiah Naidu), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (om birla), संसद भवनाच्या मुख्य कमिटी रूम मध्ये 15 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्‌घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी आज (ता.१५) संसद टीव्हीचे उद्‌घाटन होणार आहे.

संसद टीव्हीचे उद्घाटन; भारताची संस्कृती आणि चालू घडामोडी दाखविणार

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही विलीनीकरणाचा निर्णय फेब्रुवारी 2021 मधेच घेण्यात आला होता. मार्च 2021 मध्ये संसद टीव्ही च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पीएमओने सांगितले की संसद टीव्हीचे प्रोग्रामिंग प्रामुख्याने चार श्रेणींमध्ये असेल, ज्यात संसद आणि लोकशाही संस्थांचे कामकाज, धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी, भारताचा इतिहास, संस्कृती आणि समस्या, समकालीन स्वरूपाच्या चिंता यासारख्या विषयांचा समावेश आहेसंसद आणि लोकशाही संस्थांचे कामकाज, प्रशासन आणि योजना/धोरणे यांची अंमलबजावणी, इतिहास आणि भारताची संस्कृती आणि चालू घडामोडी या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे.

हेही वाचा: काबुलमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यावसायिकाचे अपहरण

हेही वाचा: रोहित पवार उभारतायत देशातला सर्वात उंच 'स्वराज्य ध्वज'

loading image
go to top