तुमच्यातील रावण प्रवृत्तीचा नाश करा : मोदी

वृत्तसंस्था
Tuesday, 8 October 2019

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त देशभर उत्साह दिसत आहे. वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाची परंपरा आहे. रावणाचा पुतळा उभा करून अनेक ठिकाणी त्याचा नाश करण्यात येतो.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) विजयादशमीनिमित्त व्हिडिओ शेअर करत तुमच्यातील रावण प्रवृत्तीचा नाश करा असा संदेश दिला आहे. 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त देशभर उत्साह दिसत आहे. वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाची परंपरा आहे. रावणाचा पुतळा उभा करून अनेक ठिकाणी त्याचा नाश करण्यात येतो. मोदींनी रावण प्रवृत्तीचा प्रभू रामचंद्राने कसा नाश केला आणि त्यांना कशी सर्वांची साथ मिळाली याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मोदींनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे, की विजयादशमीच्या शुभमुहूर्ताच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi tweet about Dussehara