G7 Summit: हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर PM मोदींनी माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले..

G7 Summit
G7 Summitesakal

G-7 च्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या हिरोशिमा दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांनी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले.

त्यानंतर त्यांनी भारतीय माध्यमांना प्रतिक्रिया दिली त् म्हणाले, "आदरणीय बापूचं स्मारक अहिंसा आणि करुणेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरेल". पंतप्रधान मोदींनी हिरोशिमा येथे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचीही भेट घेतली.

G7 Summit
Raj Thackeray: "100 वर्षांची प्रथा" भोंग्यावर आक्रमक होणारे राज ठाकरे त्र्यंबकेश्वर प्रकरणात मात्र..

महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर त्यांनी भारतीयांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “आजही हिरोशिमाचे नाव ऐकून जग हादरते. G7 शिखर परिषदेच्या या भेटीत मला प्रथम पूज्य महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा बहुमान मिळाला.

G7 Summit
Devendra Fadnavis: मोठी बातमी! भाजपमध्ये रात्रीची खलबतं सुरू; देवेंद्र फडणवीसांची रातोरात दिल्ली वारी

आज जगातील हवामान बदल आणि दहशतवादाच्या लढाईशी झुंजत आहे. पूज्य बापूंचा आदर्श हाच हवामान बदलाशी लढा जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यांची जीवनशैली निसर्गाप्रती आदर, समन्वय आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारी बुद्ध आणि गांधींची भूमी आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा जपान, पूज्य बापूंची मूर्ती त्यांना पुढे नेण्यासाठी मोठी प्रेरणा ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com