पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत 2,183 कोटी रुपयांच्या 52 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले आहे. तसेच, पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले आहे. याप्रसंगी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधितही केले.