मोदींची कमळाच्या फुलांसोबत तुला; गुरुवायूर मंदिरात पूजा

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जून 2019

गुरुवायूर मंदिर हे पाच वर्षे जुने आहे. 1638 मध्ये या मंदिराचे पुननिर्माण करण्यात आले होते. या मंदिरात फक्त हिंदूच पूजा करू शकतात. इतर धर्मियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. गुरुवायूर देवस्थानचे अध्यक्ष के. बी. मोहनदास यांनी मोदींची कमळांच्या फुलांसोबत तुला करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मोदींची फुलांसोबत तुला करण्यासाठी 112 किलो फुलांचा वापर करण्यात आला.

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केरळमधील त्रिसूर येथील गुरुवायूर मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी मोदींची कमळांच्या फुलांसोबत तुला करण्यात आली.

पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिलाच केऱळ दौरा आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात मोदींनी आज सकाळी पूजा केली. शुक्रवारी रात्रीच मोदी कोचीमध्ये पोहचले होते. पूजेनंतर मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील. तेथून ते दुपारी मालदिव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होतील. मोदींचा हा पहिला परदेश दौरा असेल. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही केरळ दौऱ्यावरच आहेत. ते वायनाडमधील मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले आहेत.

गुरुवायूर मंदिर हे पाच वर्षे जुने आहे. 1638 मध्ये या मंदिराचे पुननिर्माण करण्यात आले होते. या मंदिरात फक्त हिंदूच पूजा करू शकतात. इतर धर्मियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. गुरुवायूर देवस्थानचे अध्यक्ष के. बी. मोहनदास यांनी मोदींची कमळांच्या फुलांसोबत तुला करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मोदींची फुलांसोबत तुला करण्यासाठी 112 किलो फुलांचा वापर करण्यात आला. मोदींनी 2008 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना या मंदिरात पूजा केली होती. त्यावेळीही त्यांची तुला करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi visit Guruvayur temple in Kerala