esakal | PM मोदी वाराणसीमध्ये; 1500 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदी वाराणसीमध्ये; 1500 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

PM मोदी वाराणसीमध्ये; 1500 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार,15 जुलै 2021) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यात मोदी विकासकामांचं लोकार्पण आणि उद्धागन करणार आहेत. गुरुवारी सकाली मोदी यांचं वाराणसी विमानतळावर आगमन झालं आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर मोदी यांचं स्वागत केलं आहे.

2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान आपल्या या दौऱ्यामध्ये विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. त्यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठातील 100 बेड्सच्या एमसीएच विंगचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर गौदौलियामधील एक बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदीतील पर्यटनाच्या विकासाठीच्या नवीन रो-रो नौका आणि वाराणासी-गाजीपूर महामार्गावरील तीन लेनच्या फ्लाय ओव्हरसोबतच विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा: दिलासा नाहीच; राज्यातील कोरोना निर्बंध तुर्तास कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामध्ये 744 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. तर तर 839 कोटी रुपयांच्या कामांचं पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये सेंटर फॉर स्कील अॅन्ड टेक्निकल सपोर्ट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील भाज्यांच्या पॅकिंग करणाऱ्या हाऊसचे उद्घाटनही होणार आहे.

loading image