नववर्षाच्या पुर्वसंध्येला मोदींचे भाषण!

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

 याआधी 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशांतर्गत आर्थिक चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याची अचानकपणे घोषणा केल्यानंतर संपुर्ण देश हादरला होता.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पुर्वसंध्येला संपुर्ण देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान 31 तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता देशातील नागरिकांशी संवाद साधताना एखादा मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

देशभरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या गदारोळानंतर हे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशांतर्गत आर्थिक चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याची अचानकपणे घोषणा केल्यानंतर संपुर्ण देश हादरला होता.

नागरिकांना आपल्या जवळ असलेल्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. वैध चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. ती कमी व्हावी यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून जुन्या नोटांसंबंधी नियमांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. परंतु यामुळे केंद्र सरकारला देशातील काही घटकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. 

Web Title: PM narendra Modi will address to nation