सरकार मजबूत की मजबूर हवे? - मोदी

सरकार मजबूत की मजबूर हवे? - मोदी

बंगळूर - कर्नाटकात अनिवार्यतेतून सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी रोज मजबुरी व्यक्त करीत आहेत. अशा सरकारकडून विकास होणे शक्‍य नाही. असेच मजबूर मॉडेल केंद्रात आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण, केंद्रात मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार, हे जनतेनेच ठरवावे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजबूत सरकारसाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.

हुबळीत रविवारी (ता. १०) विविध विकास-कामांचे उद्‌घाटन झाले. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, ते उशिरा हुबळीत दाखल झाले. त्यामुळे, केवळ २५ मिनिटेच भाषण करून त्यांनी काँग्रेस व राज्यातील युती सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांना रोज धमक्‍या मिळत आहेत. काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत आणि मुख्यमंत्री डोळ्यातून पाणी काढत आहेत. उघडपणे मजबुरी 
व्यक्त करत आहेत. ते केवळ आपली खुर्ची टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा कमकुवत मुख्यमंत्र्याकडून विकास होण्याची शक्‍यता नाही. केंद्रातही असाच प्रयोग करण्याचा प्रयत्न असून जनतेनेच तो फेटाळला पाहिजे.’’

मुख्यमंत्री कुमारस्वामींना शेतकरी व युवकांचे हित नको आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ नाटक असून किती शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली? अशां कडून राज्य किंवा देशाचाही विकास होणे शक्‍य नाही. त्यामुळेच पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरवर्षी सहा लाख रुपये अर्थसाहाय्य देणार आहे. दहा वर्षात साडेसात लाख कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यत पोचणार आहेत, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांचेही भाषण झाले.

सरकारपासून सावध राहा
काँग्रेसचे नेते राज्याच्या नाही तर वैयक्‍तिक स्वार्थासाठी सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारच्या सरकारपासून सावध राहा, असा सल्ला त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com