सिंगापूर दौऱ्यात मोदींची हिंदू मंदिर, बौद्ध मंदिर आणि मशीदीला भेट

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

आज (शनिवारी) पंतप्रधान मोदींनी शिंगापूर दौऱ्यावर हिंदू मंदिर, बौद्ध मंदिर आणि मशिदीला भेट दिली. त्याचबरोबर, काही जुन्या संबधित व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या शिंगापूर दौ-यावर आहेत. यादरम्यान त्यांनी श्री मारिअमान मंदिराला भेट देऊऩ त्यांनी प्रार्थना केली. हे मंदिर देशातील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे.

सिंगापूर - आज (शनिवारी) पंतप्रधान मोदींनी शिंगापूर दौऱ्यावर हिंदू मंदिर, बौद्ध मंदिर आणि मशिदीला भेट दिली. त्याचबरोबर, काही जुन्या संबधित व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या शिंगापूर दौ-यावर आहेत. यादरम्यान त्यांनी श्री मारिअमान मंदिराला भेट देऊऩ त्यांनी प्रार्थना केली. हे मंदिर देशातील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे.

दोन देशातील सांस्कृतिक जोडणीला बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारीअमानच्या मंदिरांना भेट दिली," असे ट्विटरद्वारे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे. हे मंदिर खूप प्राचीन असून 1827 मध्ये बांधलेले आहे. हे मंदिर देवी मरियममन यांना समर्पित केलेले आहे, जे महामारीविषयक आजार व रोगांचे उपचार करण्यासाठी ज्ञात आहे. 

1826 मध्ये अन्सर साहिब यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम व्यापाऱ्यांनी बांधलेल्या चुलिया मशिदीलाही त्यांनी भेट दिली. ही मशिद शिंगापूरमधील सर्वात जुन्या मशिरदीपैकी एक आहे. त्याचबरोबर, त्यांनी बौद्ध मंदिरालाही भेट दिली.

Web Title: PM visits Hindu, Buddhist temples and mosque