
पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय (PMML) सोसायटीच्या एका सदस्याने नेहरुंची पत्रे परत करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्रे परत द्यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रिजवान कादरी यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. २००८ मध्ये सोनिया गांधी यांनी संग्रहालयातून नेहरूंची काही पत्रे आणि महत्त्वाचे दस्ताऐवज मागवले होते. ती पत्रे आणि दस्ताऐवज परत दिलेले नाहीत.