पंतप्रधान मोदींच्या पदवीची होणार चौकशी

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

आम आदमी पक्षाकडून (आप) पंतप्रधान मोदींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे रजिस्ट्रार तरुण दास यांनी मोदींची मिळविलेली पदवी बरोबर असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पदवीच्या वादाला नवे वळण मिळाले असून, दिल्ली विद्यापीठास त्यावर्षी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व रेकॉर्ड्सची तपासणी करण्यास केंद्रीय माहिती आयोगाने सांगितले आहे.

माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठाने 1978 मध्ये बीएची पदवी घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची रेकॉर्ड्स तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता तपासणी होणार आहे. पंतप्रधान मोदींनीही तेव्हाच दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे आता मोदींनी मिळविलेल्या पदवीची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम आदमी पक्षाकडून (आप) पंतप्रधान मोदींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे रजिस्ट्रार तरुण दास यांनी मोदींची मिळविलेली पदवी बरोबर असल्याचे म्हटले होते. आता माहिती आयोगाने 1978 मध्ये बीएची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर, नाव, वडीलांचे नाव, मिळालेले गुण याची सर्व माहिती देण्यास सांगितले आहे.

Web Title: PM's Degree Row: Information Commission Allows Inspection Of Delhi University Records