

PNB Currency Chest Found With Rs 17 Crore Fake Notes
Esakal
उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथं पंजाब नॅशनल बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये १७ कोटींपेक्षा जास्त रोकड बनावट असल्याचं आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांसोबत आरबीआयची टीमही याच्या चौकशीसाठी दाखल झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बँकेतील पदाधिकाऱ्यांची चौकशी केली गेली. नोटा आल्या कुठून याभोवतीच सगळा तपास फरत आहे. इतक्या मोठ्या संख्येनं बनावट नोटा थेट करन्सी चेस्टमध्ये कशा पोहोचल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेगवेगळ्या वेळी बँकांमधून इथं जमा झाल्या का याचीही चौकशी होत आहे.