
"पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा कायदेशीरदृष्ट्या भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यावर भारताचा अधिकृतपणे ताबा असेल, अशा दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे,' अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सरकारचे यापुढील लक्ष्य व्याप्त काश्मीर असेल, असे आज स्पष्ट केले.
नवी दिल्ली : "पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा कायदेशीरदृष्ट्या भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यावर भारताचा अधिकृतपणे ताबा असेल, अशा दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे,' अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सरकारचे यापुढील लक्ष्य व्याप्त काश्मीर असेल, असे आज स्पष्ट केले. तसेच, दहशतवादावर कारवाईनंतरच पाकिस्तानशी संबंध सुरळीत होतील, असेही त्यांनी सुनावले.
सरकारच्या शंभर दिवसांच्या पूर्तीनिमित्त परराष्ट्र मंत्रालयाचा लेखाजोखा जयशंकर यांनी आज मांडला. परराष्ट्र सचिव विजय गोखले हेही या वेळी उपस्थित होते. या शंभर दिवसांत मंत्रालयाच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण बळकट करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, शरद पवारांनी काय केले?
जागतिक मंचावर भारताचे म्हणणे पूर्वीपेक्षा आता अधिक गांभीर्याने ऐकले जात आहे, असे सांगताना "जी-20' देशांचे व्यासपीठ तसेच जागतिक पर्यावरण संमेलनाचे उदाहरण त्यांनी दिले. ते म्हणाले, की "शेजारी प्रथम' या धोरणानुसार भारताचे मार्गक्रमण सुरू आहे. यामध्ये परस्पर संबंध आणि व्यापारी संबंधांवर भर देण्यात आला आहे.
याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव, श्रीलंका, भूतान यांसारख्या देशांचे दौरेही केले, असे सांगून जयशंकर यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता खडे बोल सुनावले. एक शेजारी देश वेगळ्याच प्रकारचे आव्हान आहे.
"वंचितने घातली 'ही' अट; काँग्रेसकडून आघाडीचे पर्याय बंद
सीमेपलीकडील दहशतवादावर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्या देशाशी संबंध सुरळीत होणार नसल्याची स्पष्टोक्ती जयशंकर यांनी केली. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद तसेच जम्मू-काश्मीरचे 370 वे कलम रद्द करण्यावरील भारताची भूमिका प्रभावीपणे जागतिक समुदायासमोर मांडल्याचेही त्यांनी सांगितले.
आफ्रिका खंडावर लक्ष
राष्ट्रीय उद्दिष्ट यशस्वीपणे गाठण्यासाठी सरकारच्या देशांतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वोत्तम ताळमेळ असल्याचाही दावा त्यांनी केला. अनिवासी भारतीयांकडे विशेष लक्ष देण्याच्या भूमिकेअंतर्गतच अमेरिकेत, भारतीय आणि अमेरिकी नागरिकांचे संमेलन होणार आहे. त्याचप्रमाणे मागील 100 दिवसांत भारताने आफ्रिका खंडावर लक्ष केंद्रित केले असून, 18 देशांमध्ये भारतीय वकिलाती सुरू केल्या जाणार असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.