वंचितने घातली 'ही' अट; काँग्रेसकडून आघाडीचे पर्याय बंद

टीम ई-सकाळ
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकांत वंचित आघाडीला सोबत घेण्याचे पर्याय काँग्रेसकडून बंद करण्यात आले आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीत नको, अशी अट घातल्याने काँग्रेसकडून आघाडीसाठीचे पर्याय बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांत वंचित आघाडीला सोबत घेण्याचे पर्याय काँग्रेसकडून बंद करण्यात आले आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीत नको, अशी अट घातल्याने काँग्रेसकडून आघाडीसाठीचे पर्याय बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

भानुप्रताप बर्गेंचा निशाणा लागणार का?

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला होता. त्यामुळे काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालू होते, परंतु, प्रकाश आंबेडकरांकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच बाहेर ठेवण्याची अट घालण्यात आल्याने आता काँग्रेसकडूनच वंचित आघाडीला सोबत घेण्याचे पर्याय बंद करण्यात आले आहेत.

अमृता फडणवीसांनी मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् सापडल्या वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेली एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाची आघाडी विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत ही युती तुटली असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. तसेच, विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, असे राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit Aghadi puts huge conditions with congress for alliance ncp