"ती'चा लढा: "विरोध करणाऱ्यांवर पोलिस कारवाई योग्य"

"ती'चा लढा: "विरोध करणाऱ्यांवर पोलिस कारवाई योग्य"

कोझिकोड (केरळ)- शबरीमलातील मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू झालेल्या राजकीय वाद पोलिस कारवाईपर्यंत पोचला आहे. भाजपचे सरचिटणीस के. सुरेंद्रन व अन्य लोकांवर केलेल्या पोलिस कारवाईचे समर्थन केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी केले. संघ परिवार त्यांची संस्कृती येथे राबवित असल्याची टीकाही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली.

नियमांचे पालन न केल्याने रविवारी (ता. 18) रात्री उशिरा 72 जणांना अटक करण्यात आली. ""ज्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न ते अयप्पाचे भक्त नव्हते. अडथळे आणण्याच्या हेतूने संघाचे कार्यकर्ते सानिध्यम येथे मुक्काम ठोकून आहेत. सरकार शबरीमला येथे कोणालाही अडचणी निर्माण करू देणार नाही,'' असे पिनराई विजयन यांनी ठामपणे सांगितले. केरळ पत्रकार संघाच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आज सकाळी 68 लोकांना अयप्पा मंदिर परिसरातून ताब्यात घेऊन मन्नीयार येथे आणले. अयप्पा मंदिरातील प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे; पण माझे सरकार हे भाविकांसोबत आहे, असेही ते म्हणाले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मंदिरात महिलांना प्रवेश करण्याबद्दल माझ्या सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणार आहे. प्रार्थनेसाठी शबरीमला पर्वतावर येणाऱ्या महिला भाविकांना संरक्षण देणे ही वैधानिक जबाबदारी आहे, असे सांगून राज्य सरकार भाविकांच्याविरोधात असल्याच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन विजयन यांनी प्रसारमाध्यमांना केले.

शबरीमला मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याशिवाय सरकारसमोर कोणताही पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यांची कार्यपद्धती केरळमध्ये राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. संघ परिवार हा पुनरुज्जीवित चळवळीचा उत्तराधिकारी असल्याने त्यांची संस्कृती स्वीकारार्ह नाही. - पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com