पूजेच्या नावाखाली करायचा महिलांना नग्न; बलात्कारप्रकरणी तांत्रिकाला अटक | Tantrik Raped Girl | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girl raped by tantrik in Rajsthan
पूजेच्या नावाखाली करायचा महिलांना नग्न; बलात्कारप्रकरणी तांत्रिकाला अटक | Tantrik Raped Girl

पूजेच्या नावाखाली करायचा महिलांना नग्न; बलात्कारप्रकरणी तांत्रिकाला अटक

श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भाबड्या भक्तांची अनेकदा फसवणूक केली जाते. अंधश्रद्धेमुळे अनेकदा समाजात वाईट घटना घडत असतात. अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडत असतात. एक तांत्रिक पूजेच्या नावाखाली घाणेरडे कृत्य करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तांत्रिकाने अनेक मुलींवर बलात्कार (Rape) केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. 22 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 49 वर्षीय तांत्रिक राजेंद्र कुमार याला 19 मार्च रोजी अजमेर येथून अटक केली आहे. तेव्हापासून त्याच्याविरुद्ध अनेक खुलासे होत आहेत. (police arrest tantrik rajendra valmiki in Ajmer for raping 22 year old girl)

हेही वाचा: बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूत सामूहिक बलात्कार

राजेंद्र कुमार हा तांत्रिक त्याच्यासोबत देवाची पूजा करण्यासाठी महिलांना नग्न होण्यास सांगत असे. त्याने अनेक महिलांसोबत हे दुष्कृत्य केल्याची चर्चा आहे. अनेक मुलींवर बलात्कारही केल्याची भीतीही व्यक्त होत आहे. तंत्र साधनेच्या नावाखाली त्याने सुमारे 400 जणांना टार्गेट केल्याचंही समोर आलं आहे. ज्याला नुकतेच अजमेर येथून पकडण्यात आले होते.

राजेंद्र कुमार हा दिल्लीचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 10 वर्षांपूर्वी तो टॅक्सी चालवत असे, असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु या व्यवसायात त्याला चांगली कमाई होई. तो लोकांना भूत-प्रेतांचा धाक दाखवू लागला आणि तो स्वत:ला तांत्रिक म्हणवू लागला. आपल्या तंत्रविद्येने सुमारे 400 लोकांना बरं केल्याचा दावा त्याने केला आहे.

हेही वाचा: Video: पुण्यात १३ वर्षांच्या मुलीवर शाळेत बलात्कार

पोलिसांचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हा तांत्रिक कोणत्याही थराला जात असे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आपल्या शिष्यांच्या आणि अंध भक्तांच्या मदतीने लोकांच्या घरात घुसत असे. त्यानंतर तो महिलांना नग्न होऊन एकत्र पूजा करण्यास सांगत असे. यादरम्यान बलात्कारही करत असे. बदनामीच्या भीतीने महिला समोर येत नसत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या तांत्रिकावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अजमेर येथील महिलेच्या नातेवाईक महिलेशीही या तांत्रिकाने बलात्कार केल्याचा संशय आहे. अजमेरच्या आदर्श नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी सुगन सिंह यांनी सांगितले की, या तांत्रिकासोबत इतर अनेक लोकही या घाणेरड्या खेळात सामील होते. पोलीस त्याचा मोबाईलही तपासत आहेत. त्याला जुगार आणि सट्टेबाजीचाही शौक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या तांत्रिकाच्या गुन्ह्यांची मुळे किती खोलवर आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Web Title: Police Arrest Tantrik Rajendra Valmiki In Ajmer For Raping 22 Year Old Girl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top