

गाडीला साइड देण्यावरून झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या मुलानंच दोन सख्ख्या भावांवर गोळीबार केलाय. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले असून आरोपीला अटक करण्यात आलीय. हरियाणातील फरिदाबाद इथं ही घटना घडलीय. तर आरोपी दिल्ली पोलिसांत सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे.