पाटण्यात बळीराजावर पोलिसांचा लाठीहल्ला; अनेक शेतकरी जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 December 2020

पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान महासभा आणि डाव्या संघटनांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्याचे नियोजन आखले होते.

पाटणा - पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान महासभा आणि डाव्या संघटनांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्याचे नियोजन आखले होते.

गांधी मैदानापासून राजभवनाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांना डाक बंगला परिसरामध्ये रोखून धरले होते. राजभवन येथून ४ किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडून राजभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. राजभवनाच्या दिशेने जाणारा मार्च रोखणे हा देखील एक प्रकारचा अन्यायच आहे. आम्हाला राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यायचे होते, असे अखिल भारतीय किसान महासभेचे बिहारचे सचिव रामाधार सिंह यांनी सांगितले.

ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...'

येथील शेतकऱ्यांचा समावेश
आजच्या मोर्चामध्ये पूर्णिया, अररिया, सीमांचलमधील काही जिल्हे, चंपारण्य, सिवान आणि गोपालगंज येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. हे सगळे शेतकरी सोमवारीच पाटण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police beat up Farmer Patna injuring several farmers