ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...'

टीम ई सकाळ
Tuesday, 29 December 2020

बंगालचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. यासाठी जातीयवादी भाजपला दूर ठेवायला हवे, असेही ममता यांनी नमूद केले. 

बोलपूर (पश्चिम बंगाल) - भाजपने पश्चिम बंगालमध्ये आधी ३० जागा जिंकून दाखवाव्यात आणि त्यानंतर २९४ जागांचे स्वप्न पाहावे. भाजप हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असून नोबेलविजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीमध्ये द्वेषाचे राजकारण हे कधीच धर्मनिरपेक्षतेवर विजय मिळवू शकणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्या येथे आयोजित रॅलीमध्ये बोलत होत्या.

विश्‍वभारती विद्यापीठाचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती हा भाजपचा माणूस असून तो या श्रीमंत वास्तूच्या प्रतिष्ठेला नख लावण्याचे काम करत आहे. विभाजनवादी आणि जातीय राजकारण आता विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणले जात असल्याची टीका ममता यांनी केली.

हे वाचा - रजनीकांत यांच्या राजकारणात न उतरण्याच्या निर्णयावर कमल हसन नाराज

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
- भाजपचे नेते फाईव्हस्टार हॉटेलात जेवतात
- बंगालमध्ये घुसखोरीसाठी तपाससंस्थांचा वापर
- राज्यामध्ये द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी
- भाजपकडून मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर
- भाजप आमदार विकत घेऊ शकतो, तृणमूलला नाही
-लोकांनी भाजपकडून पैसे घ्यावेत, मतदान आम्हाला करावे

हे वाचा - अखिलेश यादवांनी सुरू केली उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी; विजयाचा केला दावा!

जे लोक महात्मा गांधी यांचा आदर करू शकत नाही, तेच आता सोनार बांगला तयार करू अशा घोषणा देत आहेत. अनेक दशके आधीच रवींद्रनाथ टागोर यांनी सोनार बांगला तयार केला आहे. आता त्याच बंगालचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. यासाठी जातीयवादी भाजपला दूर ठेवायला हवे, असेही ममता यांनी नमूद केले. या रॅलीच्या आधी ममतांनी चार किलोमीटरपर्यंत रोड शो देखील केला. यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamata banarjee challenge to bjp won 30 then see dream 294 seat