महिला पोलिस गँगस्टरच्या प्रेमात; अशी फुलली प्रेमकहाणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

महिला पोलिस कॉन्स्टेबल एका गँगस्टरच्या प्रेमात घायळ झाल्याची चित्र उत्तरप्रदेशात पाहायला मिळाले आहे. या गँगस्टरच्या प्रेमात महिला पोलिस इतकी आकंठ बुडाली की तिनं थेट त्याच्यासोबत लग्नगाठच बांधण्याचा निर्णय घेतला. राहुल ठसराना असे या गँगस्टरचं नाव आहे.

लखनौ :  महिला पोलिस कॉन्स्टेबल एका गँगस्टरच्या प्रेमात घायळ झाल्याची चित्र उत्तरप्रदेशात पाहायला मिळाले आहे. या गँगस्टरच्या प्रेमात महिला पोलिस इतकी आकंठ बुडाली की तिनं थेट त्याच्यासोबत लग्नगाठच बांधण्याचा निर्णय घेतला. राहुल ठसराना असे या गँगस्टरचं नाव आहे.

दोघांच्या या आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीमुळे 2002 साली मोठ्या पडद्यावर झळकलेल्या 'गुनाह'  सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या सिनेमातही अभिनेत्री बिपाशा बसूने पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका तर अभिनेता डीनो मोरियानं एका आरोपीची भूमिका साकारली आहे. सिनेमामध्ये या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं. अशीच काहीशी कहाणी गँगस्टर राहुल आणि उत्तर प्रदेशातील महिला कॉन्स्टेबलमध्येही दिसली आहे. 

दरम्यान, गँगस्टर राहुलवर 12 हून अधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. 2014 मध्ये बहुचर्चित मनमोहन गोयल हत्याकांड प्रकरणी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कायद्याचं रक्षण करणारे पोलिस आणि गुन्हेगार या दोघांमध्ये प्रेम फुलल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अशी फुलली प्रेम कहाणी
राहुल जेव्हा कारागृहात कैद होता तेव्हा ही महिला पोलिस कर्मचारी तेथेच आपलं कर्तव्य बजावत होती. यादरम्यान, दोघं मनानं एकमेकांच्या जवळ आले. कारागृह परिसरात दोघंही लपूनछपून भेटू लागले. यानंतर जशी कारागृहातून राहुलची सुटका झाली, तसं दोघांनीही थाटामाटात लग्न केलं.

राहुल आहे अनिल दुजाना गिरोहचा शार्प शूटर
2014 मधील मनमोहन गोयल हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अनिल गिरोहच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींमध्ये राहुलचाही समावेश होता. जमीन विवाद प्रकरणात कुख्यात गुंड अनिल दुजानानं आपल्या शार्प शूटर्सकडून व्यापारी गोयलची हत्या घडवून आणली होती.राहुल ठसरानानं 2008मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं. यापूर्वी तो सिकंदराबादमध्ये रिक्षा चालकाचं काम करत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police constable gangster marriage with rahul thasrana in UP