पोलिस अधिकाऱयाच्या मुलीला म्हणाला; चल लॉजवर...

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जानेवारी 2020

पोलिस अधिकाऱयाच्या मोटारीवर चालक असलेला पोलिस आणि एका पोलिस अधिकाऱयाच्या मुलीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे युवती गर्भवती राहिल्यानंतर पोलिस विवाहित असल्याचे समजले. याप्रकरणी युवतीने कारवाईची मागणी केली आहे.

बरेली (उत्तर प्रदेश): पोलिस अधिकाऱयाच्या मोटारीवर चालक असलेला पोलिस आणि एका पोलिस अधिकाऱयाच्या मुलीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे युवती गर्भवती राहिल्यानंतर पोलिस विवाहित असल्याचे समजले. याप्रकरणी युवतीने कारवाईची मागणी केली आहे.

गर्लफ्रेण्ड समजून महिला पोलिसाशी केले चॅटींग अऩ्...

पीडित युवती पोलिस निरीक्षकाची मुलगी आहे. युवतीची वडील दुसऱया जिल्ह्यातमध्ये तैनात आहेत. युवती लखनौमध्ये राहून परिक्षेची तयारी करत आहे. एका आयपीएस अधिकाऱयाच्या मोटारीवर चालक असलेल्या पोलिसाची युवतीसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पोलिस अनेकदा युवतीला लॉजवर घेऊन जात असायचा. युवती गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्न करण्याची मागणी केली. यानंतर तो तिला टाळू लागला. त्याची चौकशी केल्यानंतर तो विवाहीत असून, त्याला दोन मुले असल्याची माहिती पुढे आली.

लॉजवर असताना पोलिस आले तर...

युवतीने सांगितले की, फिरायला जायचे सांगून तो मला लॉजवर घेऊन जात होता. शिवाय, आपण विवाह करू असेही म्हणायचा. परंतु, गर्भवती राहिल्यानंतर तो टाळू लागला. पोलिस अधिकाऱयाची मुलगी असल्याने बदनामी होईल म्हणून त्याने मला एका रुग्णालयात नेले. रुग्णालयात माझा गर्भपात केला. माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक अधिकाऱयांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. संबंधित पोलिसाने अनेक युवतींचे शोषण केल्याची माहिती पुढे आली आहे. यापुढे युवतींचे शोषण होऊ नये, यासाठी लढा देणार आहे.

प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आता झोपवलाय...

पोलिस अधिकाऱयाने सांगितले की, युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई केली जाईल. परंतु, कारवाईसाठी तक्रार आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police department shook with complaint of inspectors daughter