प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आताच झोपवलाय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman run away with lover leaving husband and children at hisar

प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आताच झोपवलाय...

हिसार (हरियाना): सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून विवाहित महिलेची एकाशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि तिने पतीला आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना येथे घडली.

साली होती है आधी घरवाली पण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पती आणि दोन मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्या. सर्वजण गाढ झोपेत गेल्यानंतर तिने प्रियकरासोबत पळ काढला. प्रियकर व प्रेयसीला मांडी खुर्द गावातून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रेयसीने लैंगिक संबंधानंतर मागितले पैसे तर...

शहरातील एका कॉलनीमध्ये महिला पती व दोन मुलांसोबत राहात होती. सोशल नेटवर्किंगचा सतत वापर करत होती. फेसबुकवरून संदीप नावाच्या युवकासोबत तिची मैत्री झाली. पुढे दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले व बोलू लागले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात बुडाल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, दोघांना नवरा व मुलांचा अडसर होता. तिने नवरा व मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्या. तिघेही गाढ झोपल्यानंतर तिने प्रियकरासोबत पळ काढला. नवरा शुद्धीवर आल्यानंतर पत्नीचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. महिलेचा तपास केल्यानंतर मोबाईलच्या आधारे ती मांडी खुर्द गावात असल्याची माहिती मिळाली. दोघांना गावातून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मालक म्हणाला, माझ्या पत्नीसोबत प्रेम कर अन्...

loading image
go to top