
बिहार पोलीसांचा धक्कादायक असा कारनामा आता समोर आला आहे. एक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत असून त्यात पोलीस एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या गाडीला स्वत:च दारूच्या बाटल्यांची पिशवी टांगतात आणि खोट्या गुन्ह्यात अटक करतात. सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर आता पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळे बिहार पोलिसांवर जोरदार टीका होत आहे.