पत्नी पडली खाली तरीही दुचाकी पुढे रेटली...

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

दुचाकी गतीरोधकावर आदळल्यानंतर पत्नी  खाली पडली. मात्र, नवऱ्याला काही समजलेच नाही. तो पुढे तसाच गेला....

लखनौः उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होता. दुचाकी गतीरोधकावर आदळल्यानंतर पत्नी  खाली पडली. मात्र, नवऱ्याला काही समजलेच नाही. तो पुढे तसाच गेला....

पती पुढे गेल्यामुळे रस्त्याच्या बाजूला दुखापतग्रस्त पत्नी चिंतेत बसली होती. सुदैवाने काही वेळानंतर उत्तर प्रदेश पोलिसांची @up100 येताना दिसली. महिलेने पोलिसांकडे मदत मागताना झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनाही या घटनेचे आश्चर्य वाटले. पोलिसांनी तत्काळ दुचाकीचा पाठलाग सुरू केला. पाच किमी. पर्यंत पाठलाग केल्यानंतर पती-पत्नीची भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दुचाकी थांबवल्यानंतर पत्नी पाठीमागे पडल्याचे पतीला समजले.

संबंधित वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर चर्चेचा विषय झाला असून, अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. परंतु, या महिलेच्या मदतीला पोलिस धावून आले आणि दोघांची भेट घडली. या घटनेची माहिती उत्तर प्रदेशचे आयपीएस आधिकारी नवनीत सिकेरा यांनी आपल्या फेसबुक पेजवर दिली. यावेळी त्यांनी या घटनेचे मजेदार वर्णन करत दोघांचे छायाचित्रही अपलोड केले आहे.

Web Title: UP police followed husband up to 5 km and helps Women