एसपींची आई आजारी पडली, मध्यरात्री पोलिसांनी डॉक्टरला दवाखान्यातून उचललं; VIDEO आला समोर

Itawa Police misbehave with doctor : आई आजारी पडल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस हवालदार पाठवून डॉक्टरांना जबरदस्तीने गाडीत घालून उपचारासाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Police Forcefully Take Doctor From Hospital At Midnight SPs Mother Fell Ill

Police Forcefully Take Doctor From Hospital At Midnight SPs Mother Fell Ill

Esakal

Updated on

पोलीस अधीक्षकाने त्याची आई आजारी पडल्यानं पोलीस हवालदार पाठवून डॉक्टरांना जबरदस्तीने गाडीत घालून उपचारासाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या बळाचा वापर करून डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात येतोय. उत्तर प्रदेशातील इटावा इथं ही घटना घडलीय. डॉक्टर भीमराव आंबेडकर रुग्णालयात इमर्जन्सी वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर राहुल बाबू आणि एका फार्मासिस्टला पोलीस कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने दवाखान्यातून नेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com