श्रीराम सेना बेळगाव जिल्हाध्यक्षांस पोलिसांची बेदम मारहाण 

श्रीराम सेना बेळगाव जिल्हाध्यक्षांस पोलिसांची बेदम मारहाण 

बेळगाव - श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष विक्रम बनगे यांस चिक्कोडी पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. सोमवारी (ता. 11) दुपारी ही घटना घडली. या मारहाणीत बनगे जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (ता. 11) चिक्कोडी पोलीस ठाण्यात रवडी परेड होती. त्यामुळे बनगे यांना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हवालदारांनी फोन करुन ठाण्यात येण्यास सांगीतले होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास श्री. बनगे पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षकांनी त्यांना धारेवर धरले. 107 गुन्हे दाखल आहेत यासाठी पोलिस ठाण्यात येण्यासाठी वारवार फोन करावा लागतो असे पोलिसांनी बनगे यास सुनावले. यावर सर्व दाखल गुन्ह्यांवर आपण न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे, असे श्री. बनगे यांनी सांगितले. स्थगिती आदेश असल्यास दाखविण्याची सुचना उपनिरीक्षकांनी केली. आपण स्थगिती आदेश तहसिलदार आणि वकिलांकडे दिल्याचे श्री. बनगे यांनी सांगितले. पण पोलिसांनी त्यांना लाठीने झोडपले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com