esakal | तृणमूल कार्यकर्त्यांवर पोलिसांची ‘नजर’: ममता

बोलून बातमी शोधा

mamta banerjee

तृणमूल कार्यकर्त्यांवर पोलिसांची ‘नजर’: ममता

sakal_logo
By
पीटीआय

बोलपूर (पश्‍चिम बंगाल) - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रचार सभेवर मर्यादा आणलेल्या असताना राजकीय नेते आता पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी सभा घेत आहेत. विधानसभेच्या मतदानादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या तीन विशेष निरीक्षकांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले असून या कारस्थानाच्या विरोधात आपण निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा बोलपूर येथील सभागृहात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला.

शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्याने प्रचारावर निर्बंध आले आहेत. निवडणूक आयोगाने सभा आणि प्रचारफेरी काढण्यास मनाई केली आहे. याशिवाय सभेला केवळ पाचशे लोकांनाच हजर राहण्याचे बजावले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी आपल्या सभा रद्द केल्या आहेत. अर्थात ममता बॅनर्जी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. विरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील गीतांजली सभागृहात बोलताना त्या म्हणाल्या, मतदानाच्या आदल्या रात्री तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश निवडणूक निरीक्षकांनी पोलिसांना दिले आहेत.

हेही वाचा: कोरोनाचं संकट यंदा मोठं, खेड्यात येण्यापासून रोखा : PM मोदी

कार्यकर्त्यांना दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत ताब्यात ठेवले जात आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर अधिकाऱ्यांत झालेल्या चॅटिंगचे पुरावे आपल्याला मिळाले आहेत. अशा कारस्थानाकडे तृणमूल कॉंग्रेस दुर्लक्ष करणार नाही. निवडणुका झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे कारस्थान आणि भेदभावपूर्ण व्यवहाराविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा बॅनर्जी यांनी दिला.

आता पुरे झाले. जर निवडणूक आयोगाचे निरीक्षक राज्यात शांतता आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी काम करत असतील, तर आपल्याला कोणतीही अडचण नाही, मात्र ते भाजपला मदत करण्यासाठी काम करत आहे. त्यांना तृणमूल कॉंग्रेसला संपावयचे आहे.

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री