बिहारमध्ये गुन्हेगारांकडून पोलिस जवानाची हत्या 

पीटीआय
गुरुवार, 21 जून 2018

गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात बिहार लष्कर पोलिस (बीएमपी) दलातील जवान गुड्डू शर्मा (वय 26) याचा मृत्यू झाला. अलिपूर पोलिस स्थानकांतर्गत मदरपूर गावातील धरणाजवळ ही घटना बुधवारी पहाटे घडली. 
 

गया - गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात बिहार लष्कर पोलिस (बीएमपी) दलातील जवान गुड्डू शर्मा (वय 26) याचा मृत्यू झाला. अलिपूर पोलिस स्थानकांतर्गत मदरपूर गावातील धरणाजवळ ही घटना बुधवारी पहाटे घडली. 

शर्मा हा कामावर जाण्यासाठी आज पहाटे बोधगयेला मोटारसायकलवरून जात असताना काही गुन्हेगारांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो जागीच ठार झाला, असे सांगण्यात आले. या हत्येमागील कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Police killed in Bihar from criminal