काश्मीरमध्ये दोन हत्याचे पडसाद; आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorism

काश्मीरमध्ये दोन हत्याचे पडसाद; आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा

जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढतंच असून मागच्या दोन दिवसांत सलग दोन हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्मीरात वाद पेटला आहे. लोकांनी प्रदर्शने आणि आंदोलनं करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा मारा करण्यात आला आहे.

(Police Lathicharge, Fire Tear Gas as Protest Erupts Over Kashmiri Pandit's Killing in Budgam)

काल बडगाम जिल्ह्यातील एका तहसील कार्यालयात घुसून एका काश्मीर पंडीताची हत्या करण्यात आली होती. दोन दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट्ट यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज पुलवामा जिल्ह्यातील गुडरू येथील एका पोलिस कॉन्स्टेबलची हत्या करण्यात आली आहे. दोन अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात लोकांनी आंदोलन सुरू केले आहेत. याप्रकरणी जागोजागी पंडितांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.

हेही वाचा: German Bakery Blast: 12 वर्षांपूर्वी पुणे एका बॉम्बस्फोटामुळे हादरलं होतं

दरम्यान राहुल भट्ट यांच्या वडिलांनी सरकारी कार्यालयात १०० पेक्षा जास्त कर्मचारी होते पण राहुल यांच्यावरच गोळ्या कशा झाडल्या गेल्या असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान बडगाम जिल्ह्यातील विमानतळ रोडवर आंदोलन करत असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुरांचा मारा केला आहे. आंदोलक विमानतळाकडे जात होते त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: Pune: रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, पोलिसांचा कडक बंदोबस्त; पाहा फोटो

"पोलिस आमच्यावर अश्रूधुरांचा मारा करत आहेत पण त्यांना आत्तापर्यंत आरोपींना का पकडलं नाही?" असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान मेहबुबा मुफ्ती या उद्या बडगाम जिल्ह्याला भेट देणार आहेत.

Web Title: Police Lathicharge Fire Tear Gas As Protest Kashmiri Two Pandits Killing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top