esakal | ...म्हणून सपना चौधरीच्या गाण्यावर करायला लावला डान्स
sakal

बोलून बातमी शोधा

up police makes man dance to sapna chaudhary song for breaking lockdown

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यानही अनेकजण नियमांचे पालन करताना दिसतात. ठिकठिकाणी नियम न पाळणाऱयांवर पोलिस कारवाई करताना दिसत आहेत.

...म्हणून सपना चौधरीच्या गाण्यावर करायला लावला डान्स

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यानही अनेकजण नियमांचे पालन करताना दिसतात. ठिकठिकाणी नियम न पाळणाऱयांवर पोलिस कारवाई करताना दिसत आहेत.

पहिल्या तळीराम ग्राहकाचा हार घालून सत्कार!

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांना पोलिस वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करताना दिसतात. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे दिलेली शिक्षा पोलिसांनाच महागात पडली आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा येथील पोलिसांनी एका युवकाला लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. शिक्षा म्हणून त्याला पोलिस चौकीतच सपना चौधरीच्या 'तेरी आख्या का यो काजल.' या गाण्यावर डान्स करायला सांगितला. युवकानेही जोशात डान्स केला. यावेळी पोलिसही त्याला प्रोत्साहन देत होते.

दरम्यान, संबंधित सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीका होऊ लागली. यानंतर प्रभारी पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

लॉकडाऊनदरम्यान मित्र पत्ते खेळायला बसले अन्...