लॉकडाऊनदरम्यान मित्र पत्ते खेळायला बसले अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 28 April 2020

देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण घरामध्ये अडकून पडले आहेत. वेळ घालवण्यासाठी घरगुती खेळांकडे वळताना दिसतात.

विजयवाडा ( आंध्र प्रदेश ) : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण घरामध्ये अडकून पडले आहेत. वेळ घालवण्यासाठी घरगुती खेळांकडे वळताना दिसतात. मात्र, येथील मित्रांना पत्ते खेळण्याचा मोह महागात पडला आहे. तब्बल 24 मित्रांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

खेळात हरवल्याने नवऱयाने मोडला बोयकोच्या पाठीचा कणा...

विजयवाडा येथे लॉकडाऊनमुळे कंटाळलेले काही मित्र आणि शेजाऱ्यांनी विरंगुळ्यासाठी पत्त्यांचा डाव मांडला. मात्र, हा डाव या या सर्वांनाच महागात पडला.  पत्ते खेळणाऱ्यांपैकी 24 जणांना कोरोनाची लागण झाली. कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, विजयवाडामध्ये गेल्या काही दिवसांत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कृष्ण लंका परिसरात ट्रकचालक मित्र आणि शेजारी एकत्रित पत्ते खेळत होते. महिला घोळका करून तंबोला खेळत होत्या. यावेळी नियमांचे पालन न केल्यामुळे 24 जणांना कोरोनाची लागण झाली. कर्मिकानगर येथे एका ट्रकचालकाने फिजिकल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने 15 जणांना कोरोनाची लागण झाली.  

'महिलांची कमी कपडे अन् चुकीच्या कामामुळेच कोरोना'

दरम्यान, विजयवाडा येथे आतापर्यंत कोरोनाचे सुमारे 100 रुग्ण सापडले आहेत. सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन न होणे हे कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागचे कारण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलिस म्हणाले; लग्न करायचे का मग ये बाजूला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty four people corona positive vijayawada who play playing card