
राज्य सरकारने नियमावली घालून दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर अनेक तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे. येथील एका दुकानदाराने तळीरामाच्या गळ्यात हार घालून सत्कार केला. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेळगाव : राज्य सरकारने नियमावली घालून दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर अनेक तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे. येथील एका दुकानदाराने तळीरामाच्या गळ्यात हार घालून सत्कार केला. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मोठ-मोठ्या रांगा लागल्या आहेत. रागांची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर आज तळीराम आणि दारू हा चर्चेचा विषय ठरला आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
आई म्हणाली; भाजीपाला आणं तो सून घेऊन आला अन्...
बेळगावमध्ये आज (सोमवार) सकाळी दुकान उघडल्यावर पहिल्या ग्राहकाचा सत्कार करण्यात आला. दुकानासमोर मध्यरात्रीपासून नंबर लावला होता. सोशल डिस्टनसिंगसाठी आखून देण्यात आलेल्या चौकोनात अनेकांनी आपल्या पिशव्या ठेवून ठेवून बाजूला थांबले होते. दुकानाचा दरवाजा उघडण्याच्या वेळी मात्र तळीराम जागेवर जाऊन उभे राहिले. अनेक तळीराम दारू मिळण्याची वाट पाहात आहेत.
...अन् पत्नीच्या तोंडाला प्रेमानं लावला मास्क!
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. शिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील अनेक निर्बंध उठवले आहेत. तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.