पोलिस भरती गैरव्यवहार; 16 जणांना अटक

पीटीआय
मंगळवार, 19 जून 2018

पोलिस भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या 17 जणांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) आज अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
 

लखनौ - पोलिस भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या 17 जणांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) आज अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

उत्तर प्रदेश पोलिस भरती मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला आजपासून सुरवात झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील 56 जिल्ह्यांतील 860 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. राज्य पोलिस दलातील 41 हजार 520 जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, त्या प्रकरणी "एसटीएफ'ने आज 17 जणांना अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमरनाथ यादव या उमेदवाराऐवजी अनिल गिरी हा परीक्षा देत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांनी गुन्हा कबूल केला असून, एक मोठे रॅकेट पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले आहे. 

Web Title: Police recruitment fraud; 16 people arrested