अमूल्याच्या घरावर हल्ला; कडक सुरक्षाव्यवस्था तैनात

वृत्तसंस्था
Saturday, 22 February 2020

बंगळुरूमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात (सीएए) सुरू असलेल्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे अमूल्या नावाची मुलगी देशभरात चर्चेचा विषय ठरली.

नवी दिल्ली : बंगळुरूमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात (सीएए) सुरू असलेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. अमूल्या या तरूणीकडून या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरला. या घटनेनंतर अमूल्याच्या चिक्कामगलुरु जिल्ह्यातील घरावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर आता तिच्या घरासमोर मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

या प्रकरणानंतर अमूल्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. पण, तिने पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी फेसबुक पोस्ट गेल्या आठवड्यातच शेअर केली होती. सध्या त्यात पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर होत आहे. त्याचबरोबर तिनं फेसबुकवरून शिवजयंतीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. अमूल्याने 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या टोळक्याकडून अमूल्याच्या घरी हल्ला करण्यात आला. गुल्लागड्डे येथे कोप्पाल येथे हा हल्ला झाला. अमूल्याच्या वाझी यांनी याबाबत तक्रार दाखल केली.

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी, अमुल्या आहे तरी कोण?

हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांकडून हल्ला 

अमूल्याच्या घरावर हा हल्ला झाला. मात्र, हा हल्ला हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police security to Amulyas family after attack on house