
India’s Biggest Drug Bust: 32,000 Litres MD Seized
Esakal
तेलंगनात मीरा-भाईंदर पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी जवळपास ३२ हजार लीटर कच्चे एमडी ड्रग्ज जप्त केलेय. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १२ हजार कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी १३ जणांना अटक केलीय. पोलीस तपासात असाही खुलासा झाला की हे रॅकेट फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलंय. फॅक्ट्रीत अत्याधुनिक उपकरणे आणि काही केमिकल्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार केलं जात होतं.