
बिहारमधल्या मुंगेर येथे घडलेल्या हायप्रोफाईल डबल मर्डर केसमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीनं धक्कादायक माहिती दिली असून सुरुवातीला पोलिसांनी ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा अंदाज वर्तविला होता. पण, 24 तासांच्या आत पोलिसांनी या केसचा छडा लावला आहे. हत्या आणि आत्महत्या यामध्ये अडकलेलं हे प्रकरण दुहेरी हत्याकांड असल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.
पाटणा : बिहारमधल्या मुंगेर येथे घडलेल्या हायप्रोफाईल डबल मर्डर केसमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीनं धक्कादायक माहिती दिली असून सुरुवातीला पोलिसांनी ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा अंदाज वर्तविला होता. पण, 24 तासांच्या आत पोलिसांनी या केसचा छडा लावला आहे. हत्या आणि आत्महत्या यामध्ये अडकलेलं हे प्रकरण दुहेरी हत्याकांड असल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.
मुंगेरमध्ये घडलेल्या घटनेत रिया आणि तिचा बॉयफ्रेंड आशिफची त्याच्याच मित्रांनी हत्या केली आहे. रियावर बलात्कार करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं आशिफच्याच मित्रांनी हायप्रोफाईल दुहेरी हत्याकांड करण्याचा कट रचला. गोळीबाराच्या पद्धतीवरून हे प्रकरण आत्महत्या ते हत्या या दोन्ही संशयाच्या आजूबाजूनं फिरत होतं. चौकशीदरम्यान मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपी दानिशनं डबल मर्डर केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी दानिशनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्यानं धक्कादायक माहिती सांगितली. दानिशनं सांगितलं की, आशिफ आणि रियाचं प्रेमप्रकरण होतं. तीन-चार दिवसांपूर्वी आशिफनं तिला पिस्तुलं मिळवून देण्याचं वचन दिलं होतं. रियाला पिस्तुल चालवणं शिकायचं होतं. प्रेयसी नाराज होऊ नये म्हणून आशिफनं रियाचा हट्ट पुरवायचं ठरवलं.
घटनेच्या रात्री आशिफसोबत त्याचे आणखी दोन मित्रदेखील हजर होते. दानिशनं सांगितलं की, हत्यार उपलब्ध करून देण्याच्या बहाण्यानं आशिफ आणि त्याची प्रेयसी रियाला बोलावून घेतलं. येथे दानिशनं आपल्या मित्रांसोबत रियावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आशिफनं यास विरोध करून रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस दानिश आणि त्याच्या मित्रांनी मिळून आशिफ आणि रियावर गोळीबार केला. गोळीबारात दोघांचीही मृत्यू झाला. शुक्रवारी (20 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास आशिफ आणि रियाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.