सैराट: 'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जातेय'

police woman passes away after her father husband death at uttar pradesh
police woman passes away after her father husband death at uttar pradesh

कानपूर (उत्तर प्रदेश): महिला पोलिसाने आपल्या लहानपणीच्या मित्रासोबत विवाह केल्यानंतर कुटुंबिय नाराज झाले होते. वडिलांनी पतीचा खून केल्यानंतर 'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जातेय...' असे म्हणत महिला पोलिसानेही आत्महत्या केल्याची घटना फतेहपूर येथे घडली.

फतेहपूरच्या कल्याणपूर पोलिसांनी सांगितले की, गौसपूर गावातील रिंकी राजपूत (वय 25) या उत्तर प्रदेश पोलिस दलात शिपाई म्हणून 2018 मध्ये रुजू झाल्या होत्या. रिंकी या जालौन येथे तैनात होत्या. रिंकी यांनी दोन वर्षांपूर्वी बालपणीचा मित्र मनीष लोधी याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहाला रिंकी यांच्या घरच्यांचा विरोध होता. विवाहानंतर दोघे जालौनच्या शिवपूर परिसरात राहात होते. पाच महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. मुलीनं प्रेमविवाह केला म्हणून रिंकी यांचे आई-वडील नाराज होते. रिंकीचे वडील प्रेम सिंह, भाऊ अंकित आणि मामा देशराज यांनी 27 ऑगस्ट रोजी रिकी यांच्या घरात घुसून रिंकी यांच्या डोळ्यांदेखत मनीषची निर्घृण हत्या केली होती. यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. पतीच्या हत्येनंतर रिंकी या पाच महिन्यांच्या मुलाला घेऊन फतेहपूर येथील गौसपूर येथे सासरी आल्या होत्या. पण, जीवाला धोका असल्याची पाहून मनीषच्या आई-वडिलांनी रिंकी आणि मुलाला त्यांच्या एका नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र, रिंकी यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, रिंकी यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहीली आहे, त्यामध्ये लिहीले आहे की, 'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जात आहे. माझ्या पतीचे मारेकरी असलेले वडील, भाऊ आणि मामाला कठोर शिक्षा करा. ते कोणत्याही परिस्थितीत सुटू नयेत.' दरम्यान, प्रेमविवाह केल्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पाच महिन्यांचा मुलगा पोरका झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com