मध्य प्रदेशात काँग्रेसला झालंय काय? मतभेद पोहोचले टोकाला!

political disputes between Congress leader Kamalnath and Jyotiraditya Scindia
political disputes between Congress leader Kamalnath and Jyotiraditya Scindia

भोपाळ/नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील भाजपची वर्षानुवर्षे असणारी सत्ता उलथवून लावत काँग्रेसने सत्तेला गवसणी घातली. अनेक वर्षांनंतर मध्य प्रदेशात सत्ता येऊनही, विधानसभेचा करिष्मा काँग्रेसला लोकसभेत साधता आला नाही. त्याला पक्षातील अंतर्गत मदभेद असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेला काँग्रेसला मध्य प्रदेशात एकही जागा जिंकता आली नाही. पण, त्यानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत लाथाड्या सुरूच आहे. पराभवानंतरही काँग्रेसनं धडा घेतल्याचे दिसत नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील मतभेद काँग्रेसच्या वरिष्ठांनाही माहिती आहेत. आता हे मतभेद टोकाला पोहचले असून, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार केला नाही तर, ‘वेगळा विचार करावा लागले’, अशी धमकीच शिंदे यांनी दिल्याची चर्चा आहे. यावरून मुख्यमंत्री कलमनाथ यांनी आता दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतल्याची चर्चा आहे.  

मध्य प्रदेशातील गुणा लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेले ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांचे विश्वासातील नेते मानले जातात. पण, गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेश काँग्रेसमद्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे तीन गट आहेत. त्यात आता ज्योतिरादित्य शिंदे यांचा गट सातत्याने आक्रमक होताना दिसत आहे. मध्य प्रदेशात प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते अजय सिंह यांचे नाव चर्चेत आहे. पण, दुसऱ्याबाजूला ज्योतिरादित्य शिंदे सातत्याने आपलं नाव पुढं करत आहेत. त्यांचा गट काँग्रेसमध्ये आक्रमक होताना दिसत आहे. आता शिंदे यांनी पक्षातून बाहेर पडण्याची धमकीच दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

मध्य प्रदेशातील मंत्री आणि शिंदे यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या इमरती देवी म्हणाल्या, ‘मध्य प्रदेशातील जनतेला महाराज (ज्योतिरादित्य शिंदे) यांच्यासारखे तरुण नेतृत्व हवे आहे. पण, त्यांना राज्यातील मोठी जबाबदारी दिल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही.’ इरामती देवी या कमलनाथ यांच्या सरकारमध्ये महिला आणि बाल कल्याण खात्याची धुरा सांभाळत आहेत. शिंदे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी निदर्शने केली आहेत तसेच राजीनाम्याची धमकीही दिली आहे. यापूर्वी कमलनाथ यांच्याकडे मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण, मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतरही ते दोन्ही पदांवर कायम आहेत. प्रदेशाध्यक्षपदी आता ज्योतिरादित्य यांना जबाबदारी देण्याची त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. ज्योतिरादित्य यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती न झाल्यामुळेही अनेक नेते नाराज होते. आता ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमधून बाहेर पडले तर, हा मध्य प्रदेशसाठीच नव्हे तर, संपूर्ण काँग्रेससाठी मोठा झटका असणार आहे. सध्या शिंदे यांच्यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com