esakal | 'महाराजांनी' असं कोसळवलं, कमलनाथ यांचं सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

political drama in madhya pradesh

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे (महाराज) यांनी कमलनाथ यांच्या सरकारला धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय धुळवडीचा रंग आज उधळला जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे मोठे राजकीय पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

'महाराजांनी' असं कोसळवलं, कमलनाथ यांचं सरकार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील काँग्रेसचे माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे (महाराज) यांनी कमलनाथ यांच्या सरकारला धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय धुळवडीचा रंग आज उधळला जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे मोठे राजकीय पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण गंभीर झाले असून, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे मागवून घेतले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज सकाळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. आज संध्याकाळी ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी १६ आमदारांना घेऊन बंगळुरू गाठले. त्यापैकी सहा जण कमलनाथ यांच्या सरकारमधील मंत्री आहेत. आता भाजपच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होणार की पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांचे सरकार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाच्या पाठिंब्यावर उभे राहणार, याबाबत राजकीय चर्चांना ऊत आला आहे.  

मध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले?

मध्य प्रदेशात असा घडला राजकीय ड्रामा...
मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ, दिग्विजय सिंह, व ज्योतिरादित्य शिंदे यांचे तीन गट मानले जातात. तिघे एकमेकांच्या विरोधात राजकीय खेळी करत असून, याचा फटका कमलनाथ सरकारला बसताना दिसत आहे. प्रथम मुख्यमंत्रिपद मिळाले नाही व नंतर काँग्रेसचे अध्यक्षपद न मिळाल्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. या नाराजीमधून ते भाजपच्या संपर्कात होते.

आमदार परतले अन्...
कमलनाथ सरकारमधील आमदार बेपत्ता झाल्यानंतर कमलनाथ यांची झोप उडाली होती. मात्र, ते परतल्यानंतर कमलनाथ यांच्या जीवात जीव आला. कमलनाथ हे आपल्या सरकारमध्ये आमदारांना मंत्रिपद देण्याचा विचार करू लागले आहेत.

सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाना...
कमलनाथ सरकारमध्ये नवीन मंत्र्यांचा सहभाग करून घेण्यासाठी व चर्चा करण्यासाठी कमलनाथ हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. मात्र, पाठीमागे राजकीय धुळवड उडाली. राजकीय घडामोडीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशातील काँग्रेस अध्यक्ष पद किंवा राज्यसभेवर घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कमलनाथ दिल्लीत अन् आमदार बंगळूरमध्ये...
कमलनाथ हे दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे ज्योतिरादित्य यांनी राजकीय खेळी करत सहा मंत्र्यांसह 17 आमदारांना बंगळूरला घेऊन गेले. यानंतर त्यांनी आपले मोबाईल बंद केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

कमलनाथ भोपाळमध्ये परतले...
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाल्यानंतर कमलनाथ हे तत्काळ भोपाळमध्ये परतले. यानंतर त्यांनी दिग्विजय व ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांसी चर्चा सुरू केली.

बैठक अन् राजीनामे....
कमलनाथ व दिग्विजय यांनी तत्काळ 20 मंत्र्यासोबत बैठक केली. बैठकीमध्ये सरकार वाचवण्यासाठी मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले.

भाजप फायदा घेण्याच्या तयारीत...
मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडीचा फायदा भाजप घेण्याचा प्रयत्नात आहे. भाजपने आपल्या आमदारांची बैठक बोलावली व चर्चा केल्यानंतर पुढील राजनिती ठरवली.

दरम्यान, मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार टिकणार का यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. दुसरीकडे भाजपही फायदा उठवण्याच्या तयारीत आले. या घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी? कमलनाथांनी मंत्र्यांकडून मागवले राजीनामे