बिहारमध्ये राजकीय भूकंप येणार? लोकसभा निवडणुकीवर लालन सिंह म्हणाले...

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूचा समावेश होणार नाही
Bihar Political Latest news
Bihar Political Latest newsBihar Political Latest news

Bihar Political Latest news पाटणा : बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जेडीयूचे (JDU) विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंग (Lalan Singh) यांनी नरेंद्र मोदी (narendra Modi) सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूचा समावेश होणार नसल्याचे जाहीर केले आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, असेही ते म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह हे नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कसे सामील झाले हे तेच सांगू शकतील. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपसोबत युती करण्याबाबत लालन सिंह म्हणाले की, येणारा काळ कोणी बघितला आहे. बिहारमध्ये एनडीएचा मित्र असल्याने भाजपने केंद्र सरकारमध्ये जेडीयूला मंत्रिपद दिले होते.

Bihar Political Latest news
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख

जेडीयूला (JDU) मंत्रिपद देताना आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्री केले होते. मात्र, आरसीपी सिंग यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा जेडीयूकडून वरिष्ठ सभागृहात पाठवण्यात आले नाही. याच कारणामुळे आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आरसीपी सिंह यांचे शरीर जेडीयूमध्ये आहे. मात्र, त्यांचे मन इतरत्र आहे, असेही लालन सिंह (Lalan Singh) यांनी सांगितले.

उशिरा का होईना आरसीपी सिंह यांना हा पक्ष सोडावा लागला. यानंतर आरसीपी सिंह यांनी जेडीयूला बुडणारे जहाज म्हटले होते. जेडीयू हे बुडणारे जहाज नाही. आरसीपीला त्याची एबीसीडीही माहिती नाही. आरसीपी हा सत्तेचा मित्र आहे. जेडीयूच्या संघर्षाचा नाही, असे ललन सिंह म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com