

crime news mp
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर आणि महाआघाडीच्या दारुण पराभवानंतर देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र पाटण्यापासून जवळपास १,००० किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात ही चर्चा प्राणघातक ठरली. राजदला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून दोन मामांनी आपल्याच भाच्याला निर्घृणपणे ठार मारले. ही धक्कादायक घटना रविवारी (१६ नोव्हेंबर २०२५) कॅन्ट पोलिस स्टेशन हद्दीतील बांधकामाधीन पोलिस लाईन्स परिसरात घडली.