पंजाबमध्ये काँग्रेसला मिळणार 'बळ'; अनेक घडामोडींनंतर 'सिध्दू-कॅप्टन' एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amarinder Singh

समिती स्थापन करण्यासाठी आज काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू यांनी नागरा, परगट यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

पंजाबमध्ये काँग्रेसला मिळणार 'बळ'

चंदीगड (पंजाब) : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (CM Captain Amarinder Singh) आणि काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी आज (शुक्रवार) सत्ताधारी पक्ष आणि राज्य सरकार यांच्यात उत्तम समन्वय स्थापित करण्यासाठी व सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 10 सदस्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, धोरणात्मक गट स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत स्थानिक संस्था मंत्री ब्रह्म मोहिंद्रा (Brahm Mohindra), अर्थमंत्री मनप्रीत सिंह बादल (Manpreet Singh Badal) आणि सामाजिक सुरक्षा मंत्री अरुणा चौधरी (Aruna Chaudhary) हे सदस्य असतील. तर सिध्दू यांच्या गटाचे चार कार्यकारी अध्यक्ष (Working president) असणार आहेत. यामध्ये कुलजितसिंह नागरा, सुखविंदर सिंग डॅनी, परगट सिंह, संगत सिंह गिलजियान आणि पवन गोयल यांचा समावेश आहे.

आज सकाळी सिध्दू यांनी नागरा आणि परगट यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी पंजाबशी संबंधित मुद्द्यांवर व पक्ष-सरकारमधील समन्वय मजबूत करण्यासाठी व्यापक देखील चर्चा केली. आज स्थापन करण्यात आलेला गट आवश्यकतेनुसार, इतर मंत्री आणि तज्ञांशी सल्लामसलत करून साप्ताहिक बैठका घेईल. शिवाय, राज्य सरकारच्या आधीपासून अंमलात असलेल्या विविध पैलूंच्या प्रगतीवर चर्चा करेल आणि जलद उपाय सुचवेल.

हेही वाचा: तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

आणखी एका निर्णयात अमरिंदर यांनी आपल्या कॅबिनेट सहकाऱ्यांना पंजाब काँग्रेस भवनात उपस्थित राहण्यास सांगितलेय. काँग्रेस भवनात उपस्थित राहून मंत्री आमदार, कार्यकर्ते हे सामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करतील. कॅप्टन यांच्या सूचनेनुसार, एक मंत्री तीन तास (सकाळी 11 ते 2 पर्यंत) काँग्रेस भवनात उपलब्ध असेल. जर मंत्री एखाद्या दिवशी उपस्थित राहू शकला नाही, तर तो इतर कोणत्याही मंत्र्याशी सल्लामसलत करून पर्यायी व्यवस्था करेल. ही व्यवस्था आठवड्यातून पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार अशी असणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय साधण्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Political News Punjab Chief Minister Amarinder Singh Was Met By Navjot Singh Sidhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..