नोटाबंदीमुळे राजकारणी झाले भिकारी: पर्रीकर

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

"काही लोकांनी गोव्याला लुटणे, हाच धंदा बनविला होता. मात्र मोदीजींनी नोटाबंदीच्या केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काही राजकीय नेते अक्षरश: भिकारी बनले आहेत

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काही राजकीय नेते भिकारी झाल्याचा टोला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लगावला आहे.

"काही लोकांनी गोव्याला लुटणे, हाच धंदा बनविला होता. मात्र मोदीजींनी नोटाबंदीच्या केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काही राजकीय नेते अक्षरश: भिकारी बनले आहेत,'' असे पर्रीकर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) "संकल्प रॅली'स संबोधित करताना म्हणाले. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे एका राजकीय नेत्यास हृदयविकाराचा झटकाही आला; आणि नंतर हा झटका नोटाबंदीच्या निर्णयामुळे आला नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले, असे पर्रीकर म्हणाले.

पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्यामध्ये लवकरच होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोटाबंदीचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरण्याची दाट शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर, पर्रीकर यांचे हे विधान अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: Politicians have become beggars after demonetization: Parrikar