
राष्ट्रपतीपदाची निवडणूक शांततेत; 'या' राज्यांमध्ये १०० टक्के मतदान
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज (रविवार) शांततेत निवडणूक पार पडली. यासाठी ४,७९६ मतदारांचं मतदान यादीत नाव होतं. यांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगानं ही माहिती दिली. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा हे होते. (Polling for Presidential Polls held peacefully 100 percent voting in many states)
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदासाठी शांततेत निवडणूक पार पडली. यासाठी ४७९६ मतदार मतदानासाठी पात्र होते. पण यांपैकी ९९ टक्के मतदारांनीच प्रत्यक्ष मतदान केलं. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, पुद्दुचेरी, सिक्कीम आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये १०० टक्के मतदान पार पडलं.
हेही वाचा: शरद पवारांनी आजच्याच दिवशी पहिल्यांदा घेतली होती मुख्यमंत्रिपदाची शपथ
विरोधकांनी दोनदा बदलले उमेदवार
दरम्यान, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या उमेदवार होत्या तर यशवंत सिन्हा हे विरोधकांचे उमेदवार होते. विरोधकांनी सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यापूर्वी शरद पवार आणि त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पण या दोन्ही नेत्यांनी आपली अद्याप सक्रीय राजकारण करण्याची इच्छा असल्याचं सांगत या निवडणुकीतून माघार घेतली होती.
विरोधकांना क्रॉस वोटिंगचा बसणार फटका
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचाही दावा केला जात आहे. कारण यामध्ये गुजरातमधील राष्ट्रवादीच्या एका आमदारानं तर ओडिशातील काँग्रेसच्या एका आमदारानं तसेच आसाममधील काँग्रेसच्या सुमारे दहा आमदारांनी एनडीच्या मुर्मू यांना मतदान केल्याच्या बातम्या विविध माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. या निवडणुकीला पक्षाचा व्हिप लागू होत नाही. तसेच गुप्त पद्धतीनं हे मतदान होतं. त्यामुळं अशा प्रकारे क्रॉस वोटिंगचा प्रकार या निवडणुकीत घडू शकतो.
Web Title: Polling For Presidential Polls Held Peacefully 100 Percent Voting In Many States
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..