Pollution : देशातील आठ शहरे प्रदूषित

‘जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांका’त नोंद
 pollution
pollutionsakal

नवी दिल्ली : प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्यांमध्ये विविध उपाय योजले जात असतात. पण त्याला फारसे यश येत नसल्याचे ‘जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांका’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातील नोंदीतून दिसत आहे. आशियातील सर्वांत प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी खराब श्रेणीत पोहोचलेल्या दिल्लीचा समावेश यात नाही, हे विशेष मानले जात आहे.

हवा निर्देशांक अहवालानुसार गुरुग्राम हे सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे. जागतिक पातळीवरील हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी पुरवून नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत जनजागृती करणे हे ‘जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकाचे उद्दिष्ट आहे. रविवारी (ता. २३) सकाळी केलेल्या पाहणीनुसार गुरुग्राममध्ये सर्वाधिक प्रदूषण नोंदविण्यात आले. तेथे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) ६७९ होता.

दुसऱ्या स्थानी हरियानातील रेवरीनजीक धरुहेरा (एक्यूआय- ५४३) आहे. बिहारमधील मुझफ्परपूरचा (एक्यूआय- ३१६) तिसऱ्या क्रमांक आहे. भारता व्यतिरिक्त चीनमधील शिओशिशांग पोर्ट आणि मंगोलियातील बयान्खोशु या शहरांचा समावेश या यादीत आहे.

दिल्लीचा समावेश नाही

आशिया खंडातील दहा सर्वाधिक हवा प्रदूषण असणाऱ्या शहरांत राजधानी दिल्लीचा समावेश नाही. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी दिल्ली हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक होते. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. दिल्लीच्या नागरिकांनी यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. परंतु अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही परिश्रम करत राहू, आणि दिल्लीला जगातील सर्वांत सुंदर शहरांपैकी एक बनवू.

यादीतील भारतीय शहरांमधील ठिकाणे आणि त्यांचा एक्यूआय

तालकटोर (लखनौ) : २९८

डीआरसीसी आनंदपूर

(बेगुसराई -बिहार) : २६९

भोपाळ चौराह, देवास (मध्य प्रदेश) : २६६

खडकपाडा, कल्याण (ठाणे) : २५६

दर्शन नगर, छपरा ( बिहार) : २३९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com