esakal | हवा प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी होणार कमी : रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

हवा प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी होणार कमी

हवा प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी होणार कमी

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : जगभरात वाढत्या वायू प्रदुषणामुळे लोकांचं आयुष्य कमी होत आहे. याबाबतचं एक महत्त्वाचं संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालंय. एका अमेरिकन संशोधकांच्या गटाने आपल्या एका ताज्या संशोधनात असा दावा केलाय की, हवा प्रदुषणामुळे जवळपास 40 टक्के भारतीयांचं आयुष्यमान 9 वर्षांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट अर्थ असा आहे की, हवेच्या प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य धोक्यात असून ते जितकं जगू शकतात, त्याच्यापेक्षा 9 वर्षे कमी जगण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

हेही वाचा: सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - IMD

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट (Energy Policy Institute at the University of Chicago - EPIC) च्या माध्यमातून तयार केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की, मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणाऱ्या जवळपास 48 कोटी लोकांना तीव्र हवा प्रदुषणाचा सामना करावा लागतो आहे. EPIC च्या या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की, काळानुसार वेगवेगळ्या ठिकाणच्या हवा प्रदुषणाचा स्तर वाढत आहे. त्यातल्या त्यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील हवेची गुणवत्ता मोठ्या गतीने खराब झाली आहे.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान दोन्ही संघाकडून खेळणारा क्रिकेटर माहितीये?

प्रदुषणाच्या या तीव्रतेला लगाम लावण्यासाठी 2019 मध्ये भारतात सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (NCAP) चं कौतुक करत रिपोर्टमध्ये म्हटलंय की, NCAP मधील ठरवलेली ध्येयं गाठल्यास एकूण देश पातळीवरील आयुष्यमान 1.7 वर्षांनी तर नवी दिल्लीतील लोकांचं आयुष्यमान 3.1 वर्षांनी वाढेल.

NCAP चे लक्ष्य 2024 पर्यंत देशातील 102 सर्वात जास्त प्रभावित शहरांमध्ये 20% -30% पर्यंत प्रदूषण कमी करण्याचं आहे. त्यामध्ये औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये कपात, वाहतूक इंधन आणि बायोमास जाळण्यासाठी कडक नियम लागू करणे आणि धूळ प्रदूषण कमी करणे हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. यासाठी त्यांना अधिक चांगल्या मॉनिटरिंग सिस्टिमची आवश्यकता असेल.

loading image
go to top